सेवा पंधरवड्यानिमित्त गडचिरोलीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

241

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व भाजयुमोचे आयोजन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (प्रतिनिधी) : सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आली होती. विजयी खेळाडूंना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी युवा खेळाडूंच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप लाभले. खेळाडूवृत्ती, शिस्त आणि सेवाभाव यांचे संस्कार युवकांमध्ये रुजविणारे असे विधायक उपक्रम हेच नव्या भारताच्या निर्मितीचे भक्कम पायाभूत दगड असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कि.मो.प्र. सचिन भुरसे, जिल्हा महामंत्री सौ. गिताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, डॉ. चंदाताई कोडवते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, डॉ. भारत खटी, भाजयुमो महामंत्री आकाश सातपुते, हर्षल गेडाम, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिल्लमवार, देवाजी लाटकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. सीमाताई कन्नमवार, सौ. पुष्पाताई करकाडे, केशव निंबोड, दतु माकोडे आदी मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.