व्हाॅईस ऑफ मिडीयाच्या पंढरपूर अधिवेशनाच्या लोगोचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते अनावरण

155

व्हाॅईस ऑफ मिडीयाच्या पंढरपूर अधिवेशनाच्या लोगोचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते अनावरण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- ‘व्हाॅईस ऑफ मिडीया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित राज्य शिखर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार डॉ. नरोटे यांच्या कार्यालयात झालेल्या या अनावरण सोहळ्यास माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, पदाधिकारी अनिल पोहनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘व्हाॅईस ऑफ मिडीया’ गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, शहर कार्यकारिणी सरचिटणीस निलेश सातपुते आणि जिल्हा पदाधिकारी उदय धकाते उपस्थित होते.
या कार्यक्रमात आगामी राज्य अधिवेशनाच्या आयोजनाची रूपरेषा, पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी उपक्रम तसेच समाजातील सकारात्मक पत्रकारितेची गरज यावर सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, ‘व्हाॅईस ऑफ मिडीया’ राज्य शिखर अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे उत्साहात पार पडणार असून, राज्यभरातील पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.