Home गडचिरोली महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला श्री फाउंडेशनची पुस्तक भेट

महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला श्री फाउंडेशनची पुस्तक भेट

448

महाराष्ट्रातील पहिल्या गोंडी माध्यम शाळेला श्री फाउंडेशनची पुस्तक भेट

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १ फेब्रुवारी :- महाराष्ट्रात गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथील शाळेला श्री फाउंडेशनच्या वतीने पुस्तकांची मदत करण्यात आली. शाळेला शैक्षणिक साहित्याची गरज असल्याची माहिती मिळताच फाउंडेशनने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.

या उपक्रमाअंतर्गत श्री फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन साहित्य सुपूर्द केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणप्रवासाची माहिती घेतली. गोंडी भाषेतून दिले जाणारे अध्यापन, शाळेतील आपुलकीचे वातावरण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून फाउंडेशनचे सदस्य भारावून गेले.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेण्यात आला तसेच पारंपरिक गोंडी नृत्य सादरीकरणातून सांस्कृतिक एकतेचा सुंदर अनुभव साकार झाला. या कार्यक्रमास श्री फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. पायल श्रीकांत कोडापे, उपाध्यक्ष भाग्यश्री गडमावर यांच्यासह मंजू कोडापे, जिजाबाई कोडापे, सरिता चौधरी, प्रिया देशमुख, संध्या पवार, विद्या कांबळे, सोनाक्षी अवसरे, वैशाली मुंघाटे, प्रेमीला नवघरे, चेतन माशाखेत्री, प्रलय चहांदे, प्रकाश कोडापे आणि मामिता मडावी उपस्थित होते.

गोंडीसारख्या आदिवासी भाषेतून शिक्षण देणाऱ्या या शाळेला मिळालेली मदत केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आदिवासी भाषा व संस्कृतीच्या जतनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. भविष्यातही आदिवासी भागातील शिक्षणाच्या उन्नतीसाठी सातत्याने असे उपक्रम राबविण्याचा निर्धार श्री फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

Don`t copy text!