गडचिरोली येथील बट्टूवारच्या कारचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू

0
994

लोकवृत्त न्यूज
भिवापूर : गडचिरोली येथील प्रतिष्ठित इलेक्ट्रिक ठेकेदार तथा मनमिळाऊ स्वभावाचे सुनील बट्टूवार यांचा आज पहाटे पहाटे चार वाजता भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला धडक दिल्याने अपघात झाला अपघातात सुनील बहूवार यांचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी व स्वतः गंभीर जखमी आहेत दोघांना नागपूर येथील रुग्णालयात आयसीयू मध्ये भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सुनील बट्टूवार यांची मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे ती अमेरिकेत शिक्षण घेण्याकरिता जात होती तिचे विमान रात्री अडीच वाजता असल्यामुळे बहूवार दांपत्याने तिला एअरपोर्टला अडीच वाजता सोडले व मुलाची सकाळची शाळा असल्यामुळे परत गडचिरोली येण्याकरिता निघाले दरम्यान भिवापूर जवळ गाडी
चालवत असताना गाडीचे नियंत्रण सुटले जवळील नाल्याच्या पुलावर गाडी ने धडक दिली धडकेत गाडी पुलाच्या खालती उतरून जोरदार पलटी खात रस्त्यावरून खाली उतरली व या अपघातात मुलगा कृष्णा सुनील बहूवार याचा जागेस मृत्यू झाला तर सुनील भट्टेवार यांच्या छातीला व मानेला जोरदार दुखापत झाल्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालय हलवण्यात आलेले आहे तसेच पत्नीला मानेवर जोरदार मार बसल्याचे सूत्रांकडून कळले आहे सदर घटनेची माहिती गडचिरोलीत पसरतात सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण सध्या पुढे येऊ शकले नाही मुलगा कृष्णाच्या पार्थिव शरीराला उद्या अग्नी देण्यातील अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळालेली आहे मुलगी ही अमेरिकेला जात असताना माहिती मिळताच गोव्यावरून परत निघाली असल्याची माहिती यावेळेस देण्यात आलेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here