सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
949

लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि 2 सप्टेंबर :  गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता ९ हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळयात अडकला आहे. श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) रा. चामोर्शी असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे. सदर कारवाईने ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचे घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार यांनी १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली . तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता चामोर्शी येथील राहत्या घरी तडजोडीअंती ९ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ला.प्र.वि गडचिरोलीचे पोनि शिवाजी रोठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगिरवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here