गडचिरोली शहरातील महालक्ष्मी मंदीरात चोरी

0
382

– दानपेटीतील रक्कम चोरटयांनी पळविली


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ९ सप्टेंबर : शहरातील हनुमान वार्डात असलेल्या महालक्ष्मी मंदीरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटयांनी दानपेटीतील रक्कम पळविली आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञााताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील हनुमान वार्ड तेली मोहल्ला येथील राजु भांडेकर यांच्या घरी महालक्ष्मी मंदीर आहे. या मंदीराची देखभार स्वत: भांडेकर कुटुंब करित आहेत. दरम्यान नेमहमीप्रमाणे ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास मंदिराची साफ सफाई करत असतांना मंदीराचे कुलुप तुटलेले दिसून आले. यावेळी मंदिराची चौकशी केली असता मंदिरात असलेल्या दानपेटीचेही कुलुप तुटलेले दिसले व त्यातील अंदाजे १० ते १२ हजार रूपये लंपास केलेले दिसून आले. मंदिरात चोरी झाली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना लक्षात येताच गर्दी केली होती. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन गडचिरोली येथे सौ. आशा राजु भांडेकर यांनी दाखल केली असता अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here