कुमार आशीर्वाद मुख्य कार्याकारी अधिकारी यांचा नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी सन्मानचिन्ह देऊन सत्कार

0
154

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 01 ऑक्टोबर : कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15 वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण 50% चे वर कमी झाले.
या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव आज 30 सप्टेबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात पुष्पगुछ तथा गौरवशाली सन्मानचिन्ह देऊन समाजभान जपणारा आदरपूर्वक सत्कार धनंजय साळवे, गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पंचायत समिती, गडचिरोली चे गट शिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती पतकमवार, विस्तार अधिकारी शिक्षण एन. एस. कुमरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी एफ एस लांजेवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here