पोलीस स्टेशन चिमूर येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

188

 

लोकवृत्त न्यूज
ता.प्र. चिमुर 8 नोव्हेंबर: इनार्च फाउंडेशन तथा इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि डायगणोस्टिक सेंटर चिमूर यांच्याद्वारे ‘आपले आरोग्य आपल्या हाती अभियान’ अंतर्गत चिमूर येथे हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड तसेच इतर अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणीचे शिबीर दि. ०६/११/२०२२ रोज रविवार ला आयोजित केले होते.
या अभियाना अंतर्गत सकाळी १० वाजता पासून ते दुपारी ०२ वाजता पर्यंत इनार्च मल्टीस्पेशालिटी क्लिनिक न्यू आदर्श कॉलनी ( टीचर कॉलनी) वडाळा पैकु येथे तपासणी शिबीर राबविण्यात आले. त्यानंतर दुपारून सदर शिबीर पोलीस स्टेशन चिमूर येथे राबविण्यात आला. पोलीस स्टेशन चिमूर येथील सर्व पोलीस बांधवानी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वताची आरोग्य तपासणी करून घेतली. इनार्च फाउंडेशन चे आयोजक डॉ. विवेक कुहिटे, डॉ सुशांत पिसे यांनी सायंकाळ पर्यंत क्लिनिक आणि नंतर पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणीची सेवा दिली.