गडचिरोली आज वाघाच्या हल्ल्यात महिला बळी

0
878

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ,12 नोव्हेंबर : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा कळमटोला मार्गावर असलेल्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून महिलेस ठार केल्याची घटना आज 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मंदा संतोष खाटे (36) रा. अमिर्झा टोली ता.जि. गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खाटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अमिर्झा परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाची दशहत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा व्याघ्र बळी झाल्याने नागरिकांनी मात्र वनविभागाप्रति रोष व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसह वाघाला जेरबंद करण्यात यावे या करिता विशाल मोर्चा काढण्यात आला होता यावेळी लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने आश्वस्त केले होते मात्र वाघाला जेरबंद करण्यास वनविभाग हा अपयशी ठरत आहे. वाघाच्या दहशतीने शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत असून वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिक वारंवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here