Home Breaking News गडचिरोली: आज वाघाच्या हल्यात इसम ठार

गडचिरोली: आज वाघाच्या हल्यात इसम ठार

782

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 3 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यात आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळी राजगाटा चक ता.जि. गडचिरोली येथील सुधाकर भोयर (अंदाजे 50)यांच्या वर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली
प्राप्त माहितीनुसार, राजगाटा येथील रहीवासी सुधाकर भोयर हे शेतशिवारात बैलं राखत होते. यावेळी दबा धरुन बसलेला वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेत यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हारुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून. वारंवार वाघाचा प्राप्त बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही वाघ हुलकावणी देत वनविभागाच्या पथकाला अपयश प्राप्त होत आहे. त्यामुळे पुन्हा किती नागरिकांचा बळी वाघ घेणार ? असा रास्त प्रश्न नागरिक विचारीत आहे.

Don`t copy text!