काँग्रेसच्या विचारधारेत जनसामान्यांचे हीत

0
168

पक्षप्रवेश करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी व व्यावसायिकांचे मत 

लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.29 ऑगस्ट : देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. हे कुणीही नाकारु शकत नाही. भ्रष्टाचारविरोधी आपण लढा देऊ म्हणणारे आता सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडू लागले आहे. सातत्याने महागाई वाढत असतानाही आम्ही भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या बाता करित सामान्य नागरिकांची दिशाभूल करित आहेत. सर्वच क्षेत्रात यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. सामान्य जनतेला काँग्रेसच न्याय देऊ शकते, असा विश्वास आजही जनतेला आहे. आपण सेवा काळात कोणत्याही पक्षाशी जुळलो नव्हतो. मात्र, सेवानिवृत्तीनंतर सध्या सुरू असलेली सत्ताधाऱ्यांची दडपशाही लक्षात घेऊन आम्ही काँग्रेसची विचार स्विकारत आहोत. काँग्रेसची विचारधाराच सामान्य जनतेला न्याय देऊ शकते, असे मत काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी मदन टापरे, नगर परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश धकाते, व्यावसायिक रुपेश नांदनकर यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
सोबत प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतिश विधाते, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, भावना वानखेडे, रुपाली पंदिलवार, राजनिकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक मडके, सुनील डोग्रा, राजाभाऊ कुकडकर, वसंत राऊत, काशिनाथ कोडापे, लता मुरकुटे, आशा मेश्राम, बाळू मडावी, माजीद सय्यद, जावेद खान, मिलिंद बारसागडे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here