पत्नीला जिवे ठार मारणा-या आरोपीला जन्मठेप व 15 हजार चा दंड

0
281

गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 22 सप्टेंबर:– सविस्तर वृत्त असे की, मृतक कल्पना व तिचे पती प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी, वय 47 रा. पी. व्ही. 26 मायापुर ता. पांखाजूर जि. कांकेर छत्तीसगड यांचे दोंघाचे दुसरा विवाह झालेले असून मृतक कल्पनाचे पहीले लग्णापासून एक मुलगा सुरज आणि प्राणवल्लभ यांचे पासुन झालेले मुलगा अभिजित असे चार जण एकत्र राहत होते. हे चारही जण डिसेंबर 2012 मध्ये देऊळगांव ता. आरमोरी येथील भाउराव दहिकर यांचे शेतामध्ये टरबुज उत्पन्न काढण्यासाठी आले व तिथेच शेतात झोपडी बनवून राहत होते. होळीच्या सणाचे निमित्याने 10 दिवस पहिले दोन्ही मूल सुरज, अभिजित है वापस परिखानूर येथे निघुन गेले दिनांक ०८/०४/२०१३ रोजी यातील फिर्यादी नरेंद्र मोतीराम बनपुरकर रा. देऊळगाव याने अशी फिर्याद दिली की, भाऊराव महादेव दहीकर यांचे शेताजवळील तुळशिराम रोड यांचे शेतातील तणसीचे ढिगाजवळ एका महिलेचा सांगाळा पडलेला आहे. व सदर प्रेत हे भाऊराव दहिकर यांचे शेतातील झोपडी मध्ये राहणारी बंगाली महिला नाम कल्पना रा नंबर २६ पाखांदूर राज्य छत्तीसगढ़ हो अंदाजे एक महोण्यापासून बेपत्ता असून तिचेच प्रेत असावे असा संशय वरून पोस्टे आरमोरी येथे तोड़ी रिपोर्ट दिल्याने पोस्टे आरमोरी अकस्मात मृत्यू खबरी क्र. १२/२०१३ कलम १७४ जाफी नुसार गुन्हा नोंद करून सपोनी रविंद्र डी. पाटील सा. यांनी तपास हाती घेतला.

यातील फिर्यादी मनोहर महानंद विश्वास, वय ३० वर्ष रा नंबर २६ पाखांदूर राज्य छत्तीसगड यांनी आपले फिर्याद मध्ये असे सांगीतले की, आरमोरी पोलीसांनी दिनांक ८/४/२०१३ रोजी घटणास्थळी मिळालेल्या स्त्री जातीचा मानवी सांगाडा त्याची बहीण कल्पना राजवंशीचा असु शकतो. तसेच त्यास मयताचे सांगाडयाचे फोटो दाखविले असता सांगाड्याचे हातात असलेल्या बांगड्या. नाकातील नथ, गळयातील काळा धागा आहे ते माझी बहीण कल्पना हिचेच आहेत तसेच फोटोत जो काही थोडा चेहरा दिसतो आहे त्यावरुन सांगाडा हा त्याची बहिण कल्पना राजवंशी हिचाच आहे च तिचा मृत्यु झाला आहे. माझी बहीण कलपना व तिचा पती यांचा दोघांचाही हा दुसरा विवाह होता प्राणवल्लभ व माझी बहीण कल्पना यांचे दुचाकी खरेदी माझे नावावर का खरेदी केली नाही ? तसंच कल्पना तिचे चरित्रावर संशय घेत होता कल्पना हिचे मृत्यूपासून प्राण याचा मोबाईल बंद येत आहे व तो गावी परत देखील आलेला नाही व आमच्याशी संपर्कदेखील साधलेला नाही. म्हणून नमुद आरोपी प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यानेच माझी बहीण कल्पना यास जिवानिशी ठार मारुन तीचा मृतदेह तणसाचे ढिगात लपवून पळून गेलेला आहे. अशा फिर्यादवरुन पोस्टे आरमोरी अप.क्र. 21/2013 कलम 302, 201 भादवी अन्वये आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला

तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मार्च २०१३ मध्ये भाउराव दहोकर चे शेतात झोपड़ी मध्ये यातील आरोपी व त्याची पत्नी कल्पना सोबत असतांना रात्री ८.०० ते ८.३० दरम्यान बातील य आरोपी प्राणवल्लभ राधाकान्त राजवंशी यांनी त्याचे पत्नी मृतक कल्पना हिच्याशी झगडा भांडण करुन नायलॉन रस्सीने तिच्या गळा आवळुन मारुन टाकला व तिचे प्रेत तणशिच्या ढिगा-यातः लपवून ठेवला.

आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक 22/09/2022 रोजी आरोपी  प्राणवल्लभ राजवंशी वय 47 वर्ष रा. रायपुर यांना मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उदय वा. शुक्ल गडचिरोली यांनी आरोपिस कलम 302 भादवी मध्ये आजन्म कारावास व 10,000/- रूपये दंड तसेच कलम २०९ भादवी मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ५,०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोनि महेश हंबीरराव पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here