शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

0
187

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २७ जुलै:- आज दिनांक २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व लाडके माजी मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात फळवाटप करण्यात आला. तसेच गडचिरोली शहरातील मुख्य चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले. शिवसेना ही नेहमीच जनसेवा करणारी संघटना म्हणून प्रसिद्ध आहे. कोणत्याही तळागाळातील लोकांपर्यंत सेवा पोहचवण्यासाठी शिवसैनिक नेहमीच तत्पर असतात. हीच माननीय बाळासाहेबांची शिकवण होती. आणि आता तोच वसा मा. उध्दवसाहेबांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी गिरवत आहेत.

याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रृंगारपवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, उप जिल्हाप्रमुख सुनिल पोरेड्डीवार, राजेंद्र लांजेकर विधानसभा समन्वयक, घनश्याम कोलते ता.संघटक, तालुका प्रमुख गजानन नैताम, शहर प्रमुख संतोष मारगोनवार, विवेक बारसिंगे ग्रा.पं. सदस्य तथा प्रसिद्धीप्रमुख, तुषार मडावी सरपंच कनेरी, प्रितेश अंबादे ग्रा.पं. सदस्य, आशीष पोरेड्डीवार, हेमंत भुरसे, गंगाधर चन्नावार तथा बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here