आरमोरी: आज पुन्हा वाघांच्या हल्लात शेतकऱ्याचा बळी

0
559

लोकवृत्त न्यूज
आरमोरी 11 ऑक्टोबर : तालुक्यातील आज 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. पुरुषोत्तम सावसागडे (35) रा. रवी ता. आरमोरी असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील रवी येथील शेतकरी पुरुषोत्तम सावसागडे आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास शेतात गेले असता नरभक्षक वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन ठार केले. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले.

सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून. वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही नरभक्षक वाघाला जेरबंद करणार का अशा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे त्यामुळे पुन्हा किती नागरिकांचा बळी वाघ घेणार ? असा रास्त प्रश्न नागरिक विचारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here