महिला नक्षलीस अटक

0
322
महाराष्ट्र शासनाने ६ लाख रुपये बक्षिस केले होते जाहिर

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २५ फेब्रुवारी :- माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल दिनांक 25/02/2024 रोजी अटक केले.

आरोपी जहाल महिला माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय 30 वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली.

महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Gadchiroli police lokvruttnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here