बैलगाड्या ने होत होती दारु तस्करी

0
338

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला 03 बैलगाड्या व अवैध दारुसह 4,22,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 28 फेब्रुवारी:- गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलगाड्यांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे दिसुन येते.
काल दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­या तीन बैलगाड्या व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाड्या व ईतर 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here