चामोर्शि : वाघांच्या हल्लात गुराखी बळी

0
702

लोकवृत्त न्यूज
चामोर्शि 9 नोव्हेंबर :  तालुक्या जवळ असलेल्या भाडभिडी  ईथे दिनांक 08/11/2022 रोजी 10.00 वा.चे सुमारास दसरथ उंदरू कुनघाडकर, वय 60 वर्ष,राहणार भाडभीडी, तहसील चामोर्शि, जिल्हा गडचिरोली हे गावाजवळील जंगलात गुरे चारण्याकरीता गेले होते. परंतु ते घरी परत न आल्याने नातेवाईक व गावातील लोक आज दिनांक 09/11/2022 रोजी सकाळी 08.00 ते 09.00 वा.चे सुमारास त्यांचा शोध घेण्याकरिता गावाजवळील जंगल परिसरात गेले असता सदर इसमाच्या शरीराचे तुकडे जंगलात पडलेले दिसल्याने सदर इसमाचा मृत्यू वन्य प्राण्याकडून हल्ला होऊन झाल्याचे दिसत असल्याने गावातील लोकांनी वन विभागाला माहिती दिली वनविभागाच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शि येथे पाठविण्यात आले आहे.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून. वारंवार वाघाचा प्राप्त बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही वाघ हुलकावणी देत वनविभागाच्या पथकाला अपयश प्राप्त होत आहे. त्यामुळे पुन्हा किती नागरिकांचा बळी वाघ घेणार ? असा रास्त प्रश्न नागरिक विचारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here