आत्मसमर्पित महीलांच्या “क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ

0
242

आत्मसमर्पीत महीलांच्या नवजीवन उत्पादक संघ निर्मित “क्लीन १०१ फ्लोअर क्लिनर फिनाईल “रिलायन्स स्मार्ट” येथे विक्रीस उपलब्ध आत्मरामपतांच्या फिनाईलला मिळाली मोठी बाजारपेठ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असुन येथील आत्मसमर्पीत आदिवासी नक्षल युवक-युवतींचे पुनर्वसन होवुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे वतीने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पीतांच्या पुनर्वसनाकरीता विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आत्मसमर्पीत महीलांचे बचत गट स्थापन करुन १० महीलांना एमगिरी वर्धा या संस्थेमार्फत फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षण देवून स्वतःचा नवजीवन उत्पादक संघ स्थापन करुन “क्लीन १०१” हे फ्लोअर क्लिनर फिनाईल व्यवसाय सुरु आहे. सदरील फिनाईलकरीता बाजारपेठ उपलब्ध करण्याकरीता गडचिरोली पोलीस दल मदत करीत आहे. सदर फिनाईल हे उच्च प्रतिचे व माफक दरात उपलब्ध करुन दिल्याने कृषी विद्यापीठ अकोला, पोलीस कॅन्टीन गडचिरोली व गडचिरोली शहरातील नामांकीत शाळा, हॉस्पिटल हे खरेदी करीत असून, ग्राहकांची पसंती वाढल्याने रिलायन्स स्मार्ट या नामांकीत कंपनीने सदरील उत्पादन विक्रीसाठी मागणी केल्याने “क्लीन १०१” हे गडचिरोली येथील ‘रिलायन्स स्मार्ट येथे विक्रीकरीता उपलब्ध करण्यात आले आहे. तरी फ्लोअर क्लिनर फिनाईल ग्राहकांनी मोठया प्रमाणात खरेदी करून, आत्मसमर्पीतांच्या रोजगारवाढीस हातभार लावावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे.

गडचिरोली पोलीस दल हे आत्मसमर्पीतांच्या पुनर्वसनाकरीता कटिबध्द असून, त्याचाच एक भाग म्हणून रोजगारासाठी फ्लोअर क्लिनर फिनाईलचा व्यवसाय चालु करुन दिल्याने सदरील आत्मसमर्पीत हे रोजगारासह आर्थिकदृष्टया आत्मनिर्भर झाले आहेत. तरी कार्यरत नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण करुन नवीन जीवनाची सुरुवात करावी, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी केले आहे.

आज दिनांक २२/०८/२०२२ रोजी रिलायन्स स्मार्ट, गडचिरोली यांनी “क्लीन १०१” व्हाईट फ्लोअर क्लिनर व निम फ्लोअर क्लिनर फिनाईलची प्रथम ऑर्डरला मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा. यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना करतांना आत्मसमर्पीत महीलांच्या नवजीवन उत्पादक संघातील महीलासह आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी गंगाधर ढगे व अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here