शेकाप नेते , भाई रामदास जराते यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल

0
1607

ग्रामसभा उडेरा ची 21,75,261. लक्ष रूपये फसवणूक.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 23 सप्टेंबर :- शेतकरी कामगार पक्षाचे नेते असलेले भाई रामदास जराते यांनी सण 2021 मध्ये श्रेयस टेडर्स,च्या नावाने एटापल्ली तालुक्यातील उडेरा ग्रामसभेचे तेंदूपत्ता कंत्राट घेतले होते. तेंदु रायल्टीसह 7,700 /- रू प्रति गोणी या प्रमाणे 600 गोणी 4000 रूपये मजुरी व 3700 रूपये रायल्टी) असा तेंदु संकलनाबाबत करार करून काराराच्या अटीशर्तींनुसार रॉयल्टीची 10 टक्के रक्कम दिनांक 17/06/2020 रोजी रूपये 2,22,000/- अक्षरी- (दोन लक्ष बावीस हजार) रूपये भरणा करून प्रत्यक्ष 661.422 तेंदु गोणी संकलीत करून उर्वरीत रॉयल्टीची रक्कम 22,25,261/ रु. (अक्षरी बावीस लक्ष पंचविस हजार दोनशे एकसष्ट) प्रत्यक्ष भरणा न करता कराराच्या मुदतीनंतर फक्त 50,000/- रूपये भरणा केले. उर्वरीत तेंद् रॉयल्टीची रक्कम 21,75,261/-रूपये ( अक्षरी- एकविस लक्ष पंच्च्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट) रूपये अजूनपर्यंत दिलेले नाही.

या बाबतची तक्रार विस्तार अधिकारी यांनी गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. यात जराते यांनी हेतुपुरस्पर, ग्रामसभा प्रतिनीधी यांना खोटे दावे व खोटे आश्वासने देवून स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता तेंदु रॉयल्टीच्या रकमेचा भरणा न करता वापरली. प्रत्यक्ष तेंदु मजुराची व ग्रामसभेची फसवणुक केली आहे. यावरुन कलम 420 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून
पुढिल तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

 

शेकापचे भाई रामदास जराते यांनी दिलेली स्टेटमेंट ही स्वतःच्या बचावासाठी आहे हे सिद्ध होते. रामदास जराते यांचे साळे विजय लक्ष्मण वेळदा हे त्या ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी रीतसर तक्रार उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचेकडे केलेली आहे. त्याची प्रत पोर्टल ला प्रसारित करण्यात आलेली आहे. तरी रामदास जराते म्हणत आहेत की कोणताही ठराव किव्हा माहिती न देता गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी हे तेव्हा जरी नसले तरी आता त्या ग्रामपंचायत ला त्यांची पोस्टिंग आहे.
यावरून सिद्ध होते की, रामदास जराते स्वतःच्या बचावासाठी खोटी माहिती प्रसारित करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here