संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा – रिपब्लिकन पक्षाचे आवाहन

0
17

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २ मार्च :- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले आहे.
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत चांदेकर भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी हे आवाहन करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचीव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधान सभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंखांक लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाई सोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्यातील मौल्यवान वन व खनिज संपत्ती लुटल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगाच्या नावावर बळकावल्या जात आहेत याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले आणि या सर्व प्रश्नांवर व्यापक जनलढा उभारण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण हि आजची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. त्यासाठी आज देशभर मोठे आंदोलन सुरु असून याकामी पुढाकार घेणाऱ्या सर्व संगठना व नेत्यांना बैठकीत पूर्ण समर्थन जाहीर करण्यात आले.
या सभेला साईनाथ गोडबोले,दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजीं सहारे, कविता वैद्य यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here