बिरसा मुंडा चौकात हातपंपाची व्यवस्था करा

0
262

रुद्रापूर येथे बिरसा मुंडा चौकात हातपंपाची व्यवस्था करा ग्रामस्थाची मागणी…

लोकवृत्त न्यूज
सावली दि.23 ऑगस्ट:- सावली तालुक्यातील रुद्रापूर येथे गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची भीषण टंचाई आहे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आणि घर गुती वापरन्यासाठी सुद्धा गावात असले ल्या हात पंप किंवा विहिरीवर मोठ्या गर्दीत जाऊन तू तू मे मे करावे लागते वरील गावांमध्ये बिरसा मुंडा चौका मध्ये हातपंपाची मागणी गेले अनेक दिवसांपासून करण्यात येत असून मात्र गांभीर्याने ग्रामपंचायत नीट लक्ष देत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. वरील वार्डातील ग्रामस्थ वारंवार मागणी ग्रामपंचायत कडे करीत असून वरील गंभीर समस्या कडे लक्ष नसल्याचे बोलले जात आहे यामुळे रुद्रापूर येथील बिरसा मुंडा चौकात पिण्यासाठी व वापरण्यासाठी तसेच गावांमध्ये चालू असलेल्या बांधकाम करण्याकरिता सध्या पाण्याची टंचाई असल्याने अनेक बांधकाम करणे नाली च्या पाण्याचा वापर करन्याची पाळी आलेली आहे करिता पाण्याची सोय व्हावी करिता हातपंप मारून देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती बी डिओ सुनिता मरस्कोल्हे यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, पुरुषोत्तम पेंदाम, सयाबाई मडावी,नेताजी मडावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here