कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी जाणल्या करियरच्या नव्या वाटा

0
121

Lokvrutt news
गडचिरोली, ३ जून :- प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात बारावीनंतर काय? बारावी झाल्यानंतर विविध प्रकारच्या क्षेत्रात जाऊन आपला करिअर कसा घडवायचा, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्याच प्रश्नांची समजूत घालण्याकरिता बारावी पास विद्यार्थी आणि पालकांकरिता शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्हलपमेंट असोसिएशन आणि संकल्प एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने येथील शिवाजी महाविद्यालयात ‘बारावीपुढील करियरच्या वाटा’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून आई. एस. डी. एम. दिल्लीचे विद्यार्थी अभय पेंदाम, फरगुशन महाविद्यालय पुणेचे विद्यार्थी विशाल मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. पंकज नरुले, शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शकांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना बारावीपुढील करियरच्या वाटा समजावून सांगताना युवकांना पारंपरिक शिक्षणपद्धती वगळता इतर शिक्षणाच्या संधी, विविध कोर्स त्यांचे महत्त्व व त्यातून निर्माण होणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. सोबतच राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या नामांकित महाविद्यालय, विद्यापीठ यामधील प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती संदर्भातसुद्धा माहिती देण्यात आली. कार्यशाळेत सहभागी गरीब व होतकरू युवकांना पुढील शिक्षणाकरिता शक्य त्या पद्धतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे संकल्प एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. पंकज नरूले यांनी यावेळी विद्याथ्र्यांना सांगितले. सहभागी विद्यार्थी आणि पालकांनी कार्यशाळेत येऊन बदलत चाललेल्या करियरच्या नवनवीन संधी व कोर्सविषयी माहिती मिळाल्याबद्दल आयोजकांप्रती समाधान व आभार मानले. कार्यक्रमासाठी शिवकल्याण संस्था सचिव संतोषी सूत्रपवार, गौरव कोल्हटवार, मल्टी डिझायनर आशीष म्हशाखेत्री, शिवकल्याण संस्था आणि संकल्प एज्युकेशन फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here