जयप्रकाश जी बेद्रे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड

0
180

लोकवृत्त न्यूज
पुणे ८ एप्रिल:- उरळीकांचन,( जे.बी.सराफ ) पुणे येथील सुप्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक,लाड सोनार समाजातील ज्येष्ठ समाजसेवक,तथा सामाजिक,राजकीय,सहकार,व उद्योग क्षेत्रातील एक प्रसिद्ध,नामवंत आणि प्रथितयश व्यक्तिमत्त्व
मा.श्री.जयप्रकाशजी बेदरे ( जे.बी.सराफ पुणे )
यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे.त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव संघटनेस होईल या उद्देशाने त्यांच्या नावाचा आग्रह महाराष्ट्र राज्यातील अनेक समाजबाधंवांनी संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष मा.श्री.मधुकरराव मैड यांचेकडे धरला होता.त्यानुसार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून संघटनेचे प्रमुख सूत्रधार
मा.श्री.गोविंददादा अंबिलवादे यांच्या सहर्ष समंतीने मा.श्री.जयप्रकाशजी बेदरे यांची निवड जाहीर करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या व समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटना
व सर्व पदाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here