आपसी भांडणातून गोळीबार एटापल्ली येथील घटना

0
5859

– क्यू आर टी कमांडर जखमी तर आरोपी शिपायाला अटक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 29 ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हामध्ये आज सकाळी 08 : 30 वाजताच्या दरम्यान पोलीस क्यू आर टी एटापल्ली कमांडर विजय करपे व संतोष शिडाम यांच्यात आप-आपसात भांडण होऊन पोलीस शिपाई संतोष शिडाम याने करपे यांच्या पाटीवर गोळी चालवली.
पोलीस स्रोतानुसार संतोष शिडाम हा नेहमीच दारू पिऊन कर्तव्यावर हजर होत होता, एटापल्ली तालुका हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्याकारणाने क्यू आर टी टीम ला केव्हाही अभियानासाठी जंगलात पाठवले जाते. यामुळे विजय करपे यांनी याबाबत विचारपूस केली याचा राग मनात ठेवून आरोपी शिपाई संतोष शिडाम याने करपे यांच्यावर गोळीबार केला.यात करपे गंभिर जखम  झाले आहेत घटनेच्या वेळी संतोष शिडाम हा मध्यधुंद असल्याचे समजते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमी विजय करपे यांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले व आरोपी शिपाई शिडाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
वृत्त लिहिस्तोवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
पोलीस उपअधीक्षक हेडरी हे घटनेचा तपास करीत असून संपर्क केला असता त्यांनी घटनेबद्धल बोलण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here