लेखा येथे आढळला मुतावस्थेत बिबट्या

0
300

लोकवृत्त न्यूज
धानोरा दि.28 ऑगस्ट:- धानोरा तालुक्यातील लेखा येथिल कक्ष क्रमांक 510 सागवन प्लाँनटेशन येथे मृत बिबट्याचि लाश मिळालि. सविस्तर वृत्त दिनांक 27. 8 .20122 रोजी कुमारी वाय. पी. राऊत नियत
वनरक्षक तुकुम कक्ष क्रमांक 510 मध्ये गस्त करीत असताना त्यांना बिबट नर वनप्राणी मृता अवस्थेत आढळून आला. सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी क्षेत्र सहाय्यक धानोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा ,सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांनी मोका स्थळीत जाऊन घटनास्थळाचा मोका पंचनामा केला. घटना सायंकाळी असल्यामुळे व पंचनामा बराच वेळ झाल्यामुळे बिबट वन्य प्राण्यांचे शवविच्छेदन करता आले नाही. त्यामुळे मृत बिबट शासकीय वाहनाने वनपरिक्षेत्र कार्यालय धानोरा येथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवले .व दिनांक 28. 8. 2022 रोजी सकाळी माननीय सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांच्या उपस्थितीत श्री. डॉक्टर रोहन गालफाडे ,डॉक्टर लक्ष्मीकांत ढगारे ,डॉक्टर देविदास लोखंडे पशुधन विकास अधिकारी यांनी मृत बिबट वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले .त्यावेळी मानद वनजीव रक्षक श्री अजय कुकुडकर हे हजर होते .बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे कळू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकेल. बिबट्याला विक्री डेपो धानोरा येथे जाळण्यात आले पुढील तपासणी मा. मिलिश शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली व केळवतकर वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here