आमदार डॉ. होळी ने मतदाराला म्हटले ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का… ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल

0
1116

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २० जुलै : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभेत आमदार डॉ. होळी यांनी तलाठी आणि वनविभागाची भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी केल्याने एका मतदाराने आमदार डॉ. होळी यांना ‘तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही’ असा प्रश्न केला असता ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का’ असे आमदाराने त्याला सुनावले. याबाबतची दोघांमधील संवादाची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली असून आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक जागा आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘ओबीसी’ समाजामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून या भरतीत ओबीसींना बरोबरीने स्थान देण्यात यावे याकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच नुकताच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार होळी यांनी त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून ही पदभरती रद्द करा अशी मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने एका मतदाराने आमदार होळी यांना ‘तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही, पदभरतीत इतर समाजाच्या जागा वाढवून देण्याची मागणी करण्याऐवजी भरतीच रद्द करा अशाप्रकरची मागणी का केली असा प्रश्न विचारला असता त्या मतदाराला ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का’ एवढा का लार्ड गव्हर्नर झाला का’ अशा शब्दात सुनावले. सदर दोघाच्या संवादाची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली असून आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here