गडचिरोली : नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

0
343

– परिसरात खळबळ

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, १० मार्च : जिल्हयात नक्षल्यांनी धुकाकुळ माजवला असुन एका मागे एक घटना घडवून आणत आहेत. आता स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकाची नक्षल्यांनी हत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. साईनाथ नरोटे (२६) मर्दहुर ता. भामरागड जि. गडचिरोली असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटना नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या मर्दहुर येथील आहे.
साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षण घेत स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता अशी माहिती आहे. होळी सणानिमित्त तो स्वगावी गेला असता नक्षल्यांनी त्याला घरातून उचलून गोळी झाडून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून सदर हत्येने मात्र खळबळ उडाली आहे. साईनाथची हत्या केल्याने मात्र त्याचे स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. त्याच्या हत्येने हळहळ व्यक्त करण्यात येत. गेली काहीच दिवस नक्षल चळवळ थंडबस्त्यात होती. मात्र वाहनांची जाळपोळ व आता युकाची हत्या केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत असून गडचिरोली पोलिसांना पुन्हा अलर्ट राहण्याची वेळ आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here