Home Breaking News गडचिरोली : अपघातात एकजण जागीच ठार

गडचिरोली : अपघातात एकजण जागीच ठार

859

Lokवृत्त न्यूज
गडचिरोली, १६ डिसेंबर : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या धानोरा मार्गावरील मेंढा फाट्यावर ट्रॅक्टर ने सायकल स्वारास धडक दिल्याने सायकलस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
दुधराम गावतुरे (५५) रा.मेंढा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, उसेगाव वरून विश्रामपूर मार्गे रामदास रुमाजी पदा हे ट्रॅक्टर ने गडचिरोली ला मालवाहतूक करीत होते दरम्यान मेंढा फाटा नजीक दुधराम गावतुरे यांना हे सायकल ने जात असतांना मागेवून जोरदार धडक दिली. या अपघातात गावतुरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात आली असता. पोलीस घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक रामदास रुमाजी पदा यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

Road Accident Gadchiroil

Don`t copy text!