गडचिरोलीत सी-60कमांडो आणि नक्षल्यांमध्ये चकमक

0
2712

चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ : जिल्हयाच्या दक्षिण भागातील जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते.
गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० कमांडो अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली जंगल परिसरात अभियान राबवित असतांना पोलीस नक्षल चकमक उडाल्याचे सांगण्यात येत असुन या चकमकीत चार नक्षल्यांना कठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. दरम्यान घटनास्थळावरून पोलीसांनी मोठया प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केल्याचे कळते. चकमकीत ठार झालेल्या चारही नक्षल्यांवर ३६ लांखांचे बक्षीस होते असेही समजते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर काही दिवसांपूर्वीच देशभरात आचारसंहिता लागु झाली आहे. दरम्यान या काळात सदर चकमक उडाली. चकमकीनंतर परिसराची झडती घेतली असता नक्षल्यांचे चार मृतदेह आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here