ग्रामपंचायत दिभना येथे मासिक पाळी व्यवस्थापन बाबत जनजागृती

0
270

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २५ मे :- जागतिक पातळीवर २५ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या जगतिक मासिक पाळी दिनाची संकल्पना आम्ही कटिबद्ध आहोत त्या प्रमाणे आहे. २५ ते २८ मे दरम्यान जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन सप्ताह राबविण्यात ये असून याचेच औचित्य साधून ग्रामपंचायत दिभना येथे पंचायत समिती ग्रामपंचायतच्या वतीने किशोरवयीन मुली व गावातील महिलांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले व मासिक पाळी व्यवस्थापन बाबत जनजागृती करण्यात आली.
मासिक पाळी व्यवस्थापन हा मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञान व अंधश्रद्धेमुळे विविध रूढी परंपरामुळे मुली महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायत दिभना येथील मार्गदर्शनात गावातील किशोरवयीन मुली, महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सदर चर्चासत्रात पंचायत समिती येथील समन्वयक प्रदीप बारई, गटसमन्वयक कुमुद शेंडे, ग्रामपंचायत सचिव कु.वासंती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सरपंच गुरनुले, ग्रामपंचायत सदस्य व विविध पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here