कोरपना बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

0
194

लोकवृत्त न्यूज
कोरपना २ एप्रिल:- जिल्ह्यातील अग्रगण्य कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी एक असलेल्या कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला त्यामुळे उन्हाळ्याच्या उन्हासह राजकीय वातावरण ही तापू लागले आहे 14 सप्टेंबर 2000 ला राजुरा बाजार समितीचे विभाजन होऊन कोरपना ही कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तिवात आली या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सम्पूर्ण कोरपना तालुका व जिवती तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे असे एकूण 154 गावे बाजार समितीत समाविष्ट आहे पूर्व विदर्भात सर्वाधिक जिनींग प्रेशिंग उदयोग याच बाजार समितीच्या आधिपत्याखाली येतात त्यामुळे ही बाजार समिती महसूली उत्पन्न अग्रेसर मानली जाते बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कोरपना मुख्य आवार सह गडचांदूर जिवती येते उप आवार आहे बाजार समितीचे इतिहासातील पा च वी विभाजण निवडणूक आहे आगायात दोन टर्म कॉग्रेस तर दोन टर्म शेतकरी संघटना ही दोन पक्षाची लढाई सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here