श्रीराम फायनांस लिमिटेड चंद्रपूर शाखा येथे रक्तदान शिबिर उत्साहात

0
326

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर २७ जानेवारी:- भारताच्या 75 या प्रजासत्ताक दिन आणि श्रीराम फायनांस लिमिटेड यांच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने, श्रीराम फायनांस लिमिटेड शाखा चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आज दि. २७/०१/२०२४ ला आयोजन करण्यात आले.
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
अयोजित केलेल्या रक्तदान शिबिराची सेकलपना स्टेट हेड अमिल माहूरकर सर, एजीम नारायण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आहे.

या कार्यक्रमाला श्रीराम फायनांस लिमिटेड चे रिजनल मॅनेजर चंद्रशेखर देवतळे सर, जितेंद्र ठावळे सर आणि श्रीराम फायनांस चे कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात २१ रक्तदाबोनी रक्तदान केले. रक्तसंकलन जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर रक्तपेटी विभाग यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्रीराम फायनांस लि. चे शाखा प्रमुख चंद्रदीप चलाख, कमल मजुमदार आणि लोकेश हर्ष आदींनी परिश्रम घेक घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here