कुणाल पेंदोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सहसचिव पदी नियुक्ती

0
319

मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि सौ. किरण विजय वडेट्टीवार यांनी केले कुणाल पेंदोरकर यांचे अभिनंदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 26 ऑक्टोबर:- कुणाल पेंदोरकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्रजी सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल दादा राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी केली.
माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार हे गडचिरोली दौऱ्यावर असतांना युवक काँग्रेसचे सक्रिय युवा कार्यकर्ते कुणाल पेंदोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि सौ. किरणताई विजय वडेट्टीवार यांना कुणाल पेंदोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन व मिठाई भरवून अभिनंदन केले. युवक काँग्रेसच्या बळकटीकरण्यासाठी पक्षाने आता कुणाल पेंदोरकर यांच्यावर मोठी जवाबदारी सोपवली असून कुणाल पेंदोरकर हे आपल्या पदाचा उपयोग युवक काँग्रेस युवक काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी करतील, अशी अपेक्षा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करीत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपस्थित ऍड. रामभाऊ मेश्राम, हसणअली गिलानी, अतुल मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, निलेश हरले, कमलेश खोब्रागडे, इंद्रजित शिवरकर, पंकज बारसिंगे, तौफिक शेख, साई सिल्लमवार,मयूर संगीडवार यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here