गडचिरोली वनपरिक्षेत्रात बिबट आढळला मृत्युअवस्थेत

0
762

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 30 ऑक्टोबर:- गडचिरोली वनपरिक्षेत्रातील मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात गडचिरोली बिटामधील कक्ष क्रमांक 168 मध्ये बिबट वन्यप्राण्याची मृत शरीर आज दिनांक 30.10.2022 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास वनकर्मचान्यास गस्ती दरम्यान आढळुन आले. माहिती मिळाल्यावरुन मिलिश दत्त शर्मा, उप वनसंरक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शना खाली सोनल भडके, सहायक वनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग व अरविंद पेंदाम, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली, श्रीकांत नवघरे, क्षेत्रसहायक, गडचिरोली, भसारकर, वनरक्षक बोदली, गौरव हेमके, वनरक्षक, चांदाळा व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता, सदर घटनास्थळ कक्ष क्रमांक 168 मधील मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात घडली असुन मौका स्थळाची पाहणी केली असता, मृत बिबट हा अंदाजे दिड ते दोन वर्ष वयोगाटाचा असावा, शरीरावर कुठल्याही जखमा आढळुन आल्या नाही. सदर बिबटयाचे मृत शरीराची शवविच्छेदन डॉ. बि.ए. रामटेके, पशुधन विकास अधिकारी, पोटेगांव यांनी केले. प्राथमीक स्वरुपात मृत्यूचे कारण अदयाप कळले नसले तरी गोळा केलेल्या नमुन्याचे परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर समोर येईल. वनाधिकारी एस.बी. भडके, सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली व अ.नि. पेंदाम, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली यांनी प्राथमीक चौकशी केली असता, शरीराचे सर्व अवयव शाबुत असल्याने (नख, मिशा, पंजे इत्यादी) व आजुबाजुला शिकारी बाबतचे कुठलेही ठोस पुरावे आढले नाही. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर तसेच ग्रामपंचायत मुडझा येथील पोलीस पाटील सौ. लोचन महेंद्र मेश्राम (मुडझा बु.) तुलाराम आबाजी राऊत, पोलीस पाटील मुडझा व सौ. सुरेखा अनिल सुरपाम, ग्रामपंचायत सदस्या मुडझा हे सुध्दा उपस्थीत होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन उपरोक्त सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

सदर प्रकरणावरुन आजुबाजुच्या परिसरात बिबट व त्यांचे शावक असल्याचे संशय व्यक्त केल्या जात आहे. घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आव्हान मा. सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे. सदर घटनेची चौकशी मा. उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात मा. सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली अरविंद पेंदाम हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here