आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची वर्णी

0
77

 

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर १७ जानेवारी:- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी आज योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली, योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड व कामाचा सपाटा बघून शीर्ष नेतृत्वानी योगेश मुऱ्हेकर यांची थेट जिल्हा संघटन मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली मागील दोन वर्षात योगेश मुऱ्हेकर यांनी जिल्यात पक्ष वाढी करिता खूप मेहनत घेतली असून शेकडो नवीन लोकांचा पक्ष्यात प्रवेश करून घेतला तसेच त्याची जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मजबूत पकड असून सर्वच तालुक्यात पार्टी मजबूत करण्यात व गावागावात आम आदमी पार्टी ची विचारधारा पोहचविण्यात यश प्राप्त झाले आहे. योगेश मुऱ्हेकर हे सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर असून युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष असून उत्तम समाजसेवक सुद्धा आहे पुरोगामी विचार धारेवर चालणारे असून स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत एक परिचित नाव आहे.
पार्टीने दिलेल्या नवीन जबाबदारी बद्दल त्यांनी सर्व प्रथम पार्टीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले व श्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेवर पार्टीचे नाव व विचारधारा चंद्रपूर जिल्यातील समस्त गावागावात पोहचविण्याचे प्रण घेऊ डबल जोमाने काम करू असे सांगितले पार्टीने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण इमानदारीने व मेहनतीने पूर्ण करणार असे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here