वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
311

शेतकरी शेती करावी तर कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे

Lokवृत्त न्यूज
गडचिरोली Gadchiroil 26 डिसेंबर : जिल्हा जवळच असलेल्या आबेटोला येथील पती व पत्नी आज 26 डिसेंबर रोजी सोमवार दुपारच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत असताना अचानक शेतशिवारात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला, तिच्या नरडीचा घोट घेतला व फरफटत नेला. मंगला प्रभाकर कोहपरे (50) रा. आबेटोला जि. गडचिरोली हे गंभीर जख्मी झाल्या.
पती प्रभाकर कोहपरे यांनी आरडाओरडा केला जवळ शेतातील लोक धाऊन आले व माहिती गावातील लोकांना दिली
गावातील लोकांनी वन विभागाला माहिती देण्यात आली वन विभाग कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले व तिच्यावर उपचार सुरू आहे.

दिवसेनंदिवस जगलिप्राण्याचे मानवावर हल्ले वाढतच चालले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी परिसरातील लोकांनी केली आहे.

 

(Lokvrutt news) (tiger attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here