अल्पवयीन मुलीस जोरजबरस्तीने पळवून केला लैंगिक अत्याचार

0
869

आरोपी महिलेसह एकास अटक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ३ एप्रिल : एका महिलेने आपल्या अल्पवयीन मैत्रीणीस फूस लावून जोर जबरजस्ती करून एका इसमासह जबरजस्तीने लैंगिक संबंध करण्यास भागा पाडून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्या महिलेसह इसमावर आरमोरी पोलीस ठाण्यात पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची घटना २ एप्रिल रोजी घडली. यातील आरोपी महिलेसह एकास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २७ वर्षे महिलेने अल्पवयीन पिडीत बालीका मैत्रीणीस तूझे लग्न लावुन देतो असे म्हटले. यासाठी पीडितेचा विरोध असतांना देखील जबरदस्तीने गडचिरोली येथे नेवुन तिथे आरोपी इसमासोबत तुझे लग्न लावुन दिले आहे असे सांगुन जबरदस्तीने सदर आरोपी इसमासोबत शारीरीक संबध करण्यास भाग पाडले. दरम्यान सदर बाबत पिडीत बालीकेच्या आईने यास विरोधा केला असता तिच्या विरोधाला न जुमानता आरोपीत महिलेने पिडीत बालीकेस फुस लावुन तसेच जबरदस्तीने गडचिरोली येथे नेवुन तिथे तिला किरायाने रूम करून देवुन पिडीत बालीकेस यातील आरोपीसोबत शारीरीक संबध करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून २ एप्रिल २०२४ रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात कलम 366 (अ), 376, POSCO, 4, 6, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी महिला व व इसमास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here