बालगृहातील बालकांनी पटकावली १८ पदके

0
84

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.19: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विभागीय स्तरावर चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग नागपुर यांच्या वतीने नागपुर विभागातील कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुला-मुलींच्या कला गुणांना वाव मिळुन त्यांचा सर्वांगिन विकास होण्याच्या दुष्टीने विभागस्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव क्रीडा स्पर्धा २०२४ चे आयोजन दिनांक १२ मार्च ते १४ मार्च २०२४ दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आले होते. सदर बाल महोत्सवात शासकीय बालगृह व स्वयंसेवी संस्था मधील प्रवेशीत मुले, मुली व यांना सहभाग करुन त्यांच्यासाठी कब्बडी स्पर्धा, १०० मीटर धावणे, निबंध, रांगोळी, चित्रकला, एकल नृत्य, सामुहिक नृत्य, एकल गायन, सामुहिक गायन, इत्यादी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकरी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथील अहिल्यादेवी बालसदन घोट येथील एकुण १९ बालिका विविध स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये सामुहिक नृत्य प्रथम क्रमांक, एकल नृत्य प्रथम क्रमांक, एकल गितगायन व्दितीय, संगीत खुर्ची व्दितीय क्रमांक, कॅरम व्दितीय क्रमांक, कबडडी प्रथम क्रमांक, चित्रकला स्पर्धेत तृतीय, १०० मीटर धावणे तृतीय, लॉग जंम्प स्पर्धेत प्रथम, रिले स्पर्धेत तृतीय, लांब उडी प्रथम(मोठा वयोगट) लांब उडी व्दितीय (लहान वयोगटत), गोळा फेक प्रथम, व्हॉलिबॉल व्दितीय, लंगडी व्दितीय अशा प्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्हयातील बालकांनी एकुण १८ पदके पटकावून गडचिरोली जिल्हयाचा मान वाढविल्याबद्दल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कौतुक केले आहे.
सदर समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) कवेश्वर लेनगुरे, बाल संरक्षण (संस्थाबाहय) प्रियंका आसुटकर, बालसदन घोट येथील अधिक्षिका ललीता कुजुर, प्रणाली सुर्वे समुपदेशक वॅन स्टाप सेंटर गडचिरोली हेउपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here