मुडझातील वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
255

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १९ फेब्रुवारी : तालुक्याच्या मुडझा येथील सार्वजनिक वाचनालयात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शशिकांत कोवे यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद उमरगुंडावार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य विवेक बारसिंगे, राकेश लोणारकर, शिक्षक गायकवाड, शिक्षिका जांभुळकर, उईके, वाचनालयातील विद्यार्थी व शाळेती विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सोनुले तर आभार पूजा भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड्डू रेचनकर, गणेश गडपायले, अजय राऊत, मनोज गडपायले, राहुल धंदरे, गरव चौधरी, अमित चुधरी, सोनू मोरांडे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here