गडचिरोली: चालक पोलिस शिपाई १२३४ उमेदवारांची लेखी परिक्षा २६ मार्च ला 

0
513

गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षा संबंधीत सुचना

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २३ मार्च:- गडचिरोली पोलीस दलातर्फे १६० चालक पोलीस शिपाई संबंधीत मैदाणी परीक्षा ही दिनांक ०२/०१/२०२३ ते ०५/०१/२०२३ रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. त्यानंतर चालक पदासाठी चालक कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची दिनांक १६/०१/२०२३ ते २८/०१/२०२३ रोजी पर्यंत चालक कौशल्य चाचणी परिक्षा घेण्यात आली होती आणि दोन्ही चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकूण १२३४ उमेदवारांची लेखी परिक्षा ही दिनांक २६/०३/२०२३ रोजीचे सकाळी ०८.३० वा. आयोजीत करण्यात आलेली आहे. यामध्ये पहिला पेपर सामान्य ज्ञान या विषयाचा सकाळी ०८.३० ते १०.०० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी ११.०० ते १२.३० वा. दरम्याण घेण्यात येणार आहे.

सदर चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर व शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी ०२ (दोन) तास अगोदर पोहचणे आवश्यक आहे. चालक पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमदवारांनी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या लेखी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन लेखी परिक्षेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रानिशी उपस्थित राहावे. तसेच सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात येईल. सोबतच परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, उमेदवारांसाठी पेन व पॅड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सोबतच पहील्या व दुसऱ्या पेपरच्या मधल्या वेळेत नाश्त्याची सुद्धा सोय उमेदवारांसाठी करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये कुणीही बॅग, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोबत बाळगणार नाहीत व कोणताही गैरप्रकार करणार नाही. उमेदवाराला फक्त सोबत ओळखपत्र, प्रवेशपत्र व पाणी बॉटल घेऊन जाण्याची मुभा राहील. कोणताही उमेदवार गैरप्रकार किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनीक साधनांचा वापर करतांना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी व तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये व कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर माहिती द्यावी, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी केलेले आहे. या लेखी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. व इतर अधिकारी यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here