विविध बुद्धविहारातून बालगोपाल घेत आहेत धम्म संस्काराचे धडे

0
164

Lokvrutt news
गडचिरोली, ५ जून :- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शहरातील विविध बुद्धविहारातून बाल धम्म संस्कार
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सम्यक बुद्धविहार गोकुलनगर, प्रबुद्ध बुद्धविहार विवेकानंदनगर, आम्रपाली बुद्धविहार फुले वॉर्ड, तसेच रामनगर येथील पंचशील बुद्धविहारात मुलांवर धम्माचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुष्पहाराने पूजन व अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. या बुद्धविहारातून १२५ च्या जवळपास बालगोपाल संस्कार शिबिरात सहभागी झाले आहेत. धम्म प्रचारक म्हणून जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे, उपाध्यक्ष लहू रामटेके, शहराध्यक्ष बाळकृष्ण बांबोळे, शहर सरचिटणीस सूर्यभान घुटके, गडचिरोली तालुकाध्यक्ष मच्छिंद्रनाथ बनकर, महिला विभागाच्या सचिव सुमित्रा राऊत, ज्योती उराडे, स्वर्णमाला अमरसेन मेश्राम, लीना ढोलणे, केंद्रीय शिक्षिका सुरेखा बारसागडे आदी पदाधिकारी शिबिराला मार्गदर्शन करीत आहे. पंचशील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष सुखदेव वासनिक यांनी पंचशील बुद्ध विहार रामनगर येथे संस्कार शिबिराचे उद्घाटन करून शिबिराचे महत्त्व सांगितले. हे शिबिर ८ तारखेपर्यंत चालणार आहेत. संचालन व प्रास्ताविक सरचिटणीस प्रा. गौतम डांगे यांनी केले, तर आभार केंद्रीय शिक्षिका सुरेखा बारसाकडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here