‘प्रकृती माझा देव’ मधुन आदिवासी संस्कृतीचे दर्शन

0
734

मिसेस इंडिया २०२१ मनिषा मडावी यांनी गीतात अभिनय केला


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली Gadchiroil, 8 डिसेंबर: गोंडी संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने आदिवासी समाज प्रकृतीचे जतन, जल जंगल जमीन याचे रक्षण करते आहेत प्रकृती पूजक आहेत,प्रकृती प्रेमी आहेत. याचे दर्शन घडविणारी कवयित्री मालती शेमले लिखित प्रकृती माझा देव ही मराठी कविता.. निलेश तोडसाम यांनी गोंडी ट्रान्सलेट करून मिसेस इंडिया 2021 मनीषा मडावी ( Mrs India 2021 Manisha Marathi ) यांनी स्वतःच्या सुरेख आवाजात स्वरबद्ध करून स्वतःच या गीतात अभिनय केले आहे व यांचा मुलगा सज्ज मडावी बालकलाकार म्हणून अभिनय केले आहे ..

https://youtu.be/NX-uLsJGscA

या गीतात प्रकृतीशी निगडित जल जंगल जमीन हवा पशुपक्षी याबद्दलचे प्रेम व्यक्त होत आहे. या गीताची शूटिंग गडचिरोली जिल्ह्यातील तालुका धानोरा जवळील सोडे वरातीडोह या निसर्गरम्य ठिकाणी झाली आहे. या गीताचे प्रोडूसर जगदीश मडावी आहेत, मंगेश मंडाले यवतमाळ कोरिओग्राफी तर जिम्मी स्टुडिओ यवतमाळ सुबोध वलके यांनी कॅमेराबद्ध केले आहे. हे गोंडी अल्बम गीत “गोंडी राणी मनीषा ” या यूट्यूब चैनल ला बघायला मिळत आहे. तीन दिवसांमध्ये आठ हजार लोकांनी हे गीत पाहिलेला आहे. या गीताला खूप छान प्रतिसाद मिळत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here