गडचिरोलीतील मीनाबाजारातून शहरवासीय लुटतायेत आनंद,

0
428

२७ पर्यंत मीनाबाजार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली Gadchiroil २३ नोव्हेंबर : शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन परिसरात माउली एकता प्रस्तुत ‘गडचिरोली एक्स्पो’ मीनाबाजार मागील २ नोव्हेंबरपासून सुरु आहे. या मीनाबाजारातून शहरवासीय आनंद लुटतांना दिसून येत आहेत. आता हा मीनाबाजार २७ नोव्हेंबर पर्यंतच शहरात राहणार असून नागरिकांनी भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन मीनाबाजारचे संचालकांनी केले आहे.
गडचिरोली शहरात २ नोव्हेंबरपासून मीनाबाजार सुरु आहे. या मीनाबाजारात आकाश झुला, कोलोंबोस, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक उपकरणे व कुटुंबियांसाठी रेल्वे धावताना दिसत आहे. सायंकाळच्या सुमारास विद्युत रोषणाईने झगमगणारे मीनाबाजार गडचिरोलीकरांना आकर्षित करीत आहे. सोबतच लहान मुलांसाठी खेळणे, महिला-पुरुषांसाठी आकर्षक वस्तू सुद्धा विक्रीस ठेवले आहेत. शहरवासीयांसाठी विरंगुळाचे साधन ठरणाऱ्या मीनाबाजाराचे आनंद अवघ्या काही दिवसच लुटता येणार आहे. गडचिरोली शहरात २७ नोव्हेंबर पर्यंतच हे मीनाबाजार राहणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मीनाबाजारातील ब्रेक डान्स झुल्यावरील खुर्ची तुटून अपघात झाला होता. यात एक युवती जखमी झाली होती. सदर जखमी युवतीचा संपूर्ण उपचाराचा खर्च स्वतः संचालकांनी उचलला असून ब्रेक डान्स झुलाच बंद करण्यात आला आहे. ही घटना आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे आहे. मीनाबाजारात लोकांच्या सुरक्षेची हमी आपण स्वतः घेत असून झालेल्या घटनेबाबत संचालकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता सुरक्षेची हमी सुद्धा घेतली असल्याचे संचालकांनी स्पष्ट केले आहे.

#Gadchiroil #Meena #Bazaar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here