कुरखेडा : महिला तलाठीची उपोषणकर्त्यांना फोनद्वारे धमकी, म्हणतात ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’

0
585

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली , १५ मार्च : जिल्हाभरात अवैधरित्या गौण खनिजप्रकणी प्रकरण ताजे असतांनाच जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील अवैध रेती उपसा, विटभट्टी अधिक तापले असून या विरोधात कुरखेडा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना महिला तलाठी ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’ अशी फोनद्वारे धमकी दिल्याने आता एकाच खळबळ उडाली असून याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात ध्वनिफीतसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
मागील काही दिवसांपासून कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला अवैध रेती उपसा व गावात असलेल्या अवैध वीटभट्टी धारकांवर निवेदन देऊन कारवाई करण्याची विनवणी गावकऱ्यांनी केली मात्र त्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शेवटी उपोषणाचे शस्त्र हाती घेत सोमवार १३ मार्च पासून कुरखेडा तहसील कार्यलयासमोर कुंभीटोला येथील चेतन गहाणे व राजू मडावी हे उपोषणास बसले. उपोषणाला बसल्यापासून अद्याप कोणतीही कारवाई केलेल्या मागणीवर झाली नाही तथापि महिला तलाठी यांनीउपोषणकर्त्यांना ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’ अशी फोनद्वारे
धमकी दिल्याचे कळते. याबाबत यांनीउपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here