गोंडवाना विद्यापीठामार्फत मैदानी खेळाच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने विद्यार्थ्यांनी व्यक्त केला रोष

0
792

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी पंतप्रधानांच्या खेलो इंडिया या संकल्पनेचे वाजविले तीन तेरा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २४ नोव्हेंबर :- २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने वार्षिक ऍथलेटिक्स मिळण्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे गोंडवाना विद्यापीठ पत्रकानुसार जिम्मेदारी घेतली होती सदर स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ ग्राउंड गडचिरोली येथे घेण्याचे ठरवले परंतु नियोजना अभावी स्पर्धा एम.आय.डी.सी ग्राउंड वर घेण्याचे निर्देश देण्यात आले या स्पर्धेसाठी गडचिरोली चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित झालेले होते परंतु प्रत्यक्ष मैदानावर कुठलाच मंच तयार नव्हता पिण्याचे पाणी ची सोय नव्हती सावली सुद्धा नव्हती खेळाडू जमेल त्या झाडाखाली स्वतःचे आणलेल्या दर्यावर बसले होते तेवढेच नव्हे महिला खेळाडूंना ट्रॅक सूट बदलविण्यासाठी झाडांचा आडोश्याला जावे लागत होते. धावपट्टया सुद्धा व्यवस्थित नसून खडतर होत्या विद्यापीठाचा कुलगुरू किंवा त्यांच्यावतीने कुणीतरी जबाबदारी घेऊन कार्यक्रमाचे विस्तार उद्घाटन करून खेळाडू प्रतिनिधीच्या हातात जळती मशाल देण्याची रीत आहे परंतु विद्यापीठाकडून कुठलीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने दूर दुरून आलेल्या खेळाडूंची नाराजी झाली व त्यांनी नियोजनाच्या बहिष्कार केला आणि घोषणा देत होते तेव्हा कुलगुरूच्या कार्यालयावर धडकले कारण काहिच नियोजन नसल्यामुळे पुर्ण विद्यार्थी नाराज होते
विद्यापीठ अंतर्गत खेळत उत्तम खेळाडूची निवड करून औरंगाबाद येथील होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेत पाठवलेल्या जाणार होते त्यातून पुढे देशव्यापी वर या विद्यार्थ्यांमधून काय खेळ जाऊ शकतील परंतु अजूनही उद्घाटन न झाल्याने गोडवाना विद्यापीठातील स्पर्धक अश्वमेघात सहभागी होऊ शकतील का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे

डॉ. प्रशान्त बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
यांच्याशी संपर्क केला असता ते मी आता बाहेर विमानामध्ये आहे असा उत्तर देऊन त्याबद्दल मला काही माहीत नाही असे सांगितले

डॉ. अनिल हिरेखण कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे संपर्क केला असता ही स्पर्धा आम्ही रद्द करून 25 ते 27 वरोरा येथे होणार आहेत असेसांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here