गडचिरोली जिल्हा भरती वाहान चालक चाचणी तारीख जाहीर

0
468

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती- २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेल्या उमेदवारांचे वाहन कौशल्य चाचणी करीता वेळापत्रक. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच आपण खालील लिंक वर सुद्धा पाहू शकता.👇👇👇

https://gadchirolipolice.gov.in/files/Instrucan/3.pdf

लोकवृत्त न्यूज

गडचिरोली 14 जानेवारी:- गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई (चालक) भरती 2021 मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेल्या उमेदवारांचे वाहन कौशल्य

चाचणी करीता वेळापत्रक. -: उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचना :-

दिनांक 02/01/2023 पासून गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक 2021 करीता मैदानी चाचणी

परीक्षा घेण्यात आली होती.

सदरच्या वाहन कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी ही दिनांक 11/01/2023 रोजी उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर व पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील बाहेरील फलकावर यादी उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली होती.

सदर यादीमध्ये उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी 13/01/2023 चे सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आलेल्या आक्षेपांवरुन सदर यादीमध्ये किरकोळ बदल करुन अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

वाहन कौशल्य चाचणी करीता पात्र झालेल्या उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील MT गेट येथे सोमवार दिनांक 16/01/2023 पासून सकाळी 05:30 वाजता सुरु होणार असल्याने उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी द्वारे चालक कौशल्य चाचणीची दिनांक व वेळ कळविण्यात येईल तसेच गडचिरोली पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in यावर वाहन कौशल्य चाचणीचे वेळापत्रक खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here