गडचिरोली : बेपत्ता असलेल्या साहिलचा मृतदेहच आढळला

2807

– घटनेने खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १२ एप्रिल : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंदाळा येथील साहिलचा वैनगंगा नदीकाठावर बुधवार १२ एप्रिल रोजी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा मुख्यलयापासून पासून जवळच असलेल्या इंदाळा येथील साहिल रंजन जेंगठे (१९) हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शोध घेतला असता बुधवार १२ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी काठावर साहिलचा मृतदेहच आढळून आला. साहिलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळायचे असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.