गडचिरोली: पोलिस नक्षलवाद्यांमध्ये चकमक ३ नक्षलवादी ठार

1153

(lokvrutt news) (naxal police firing)

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 30 एप्रिल : गडचिरोली जिल्ह्याच्या मनेराजाराम ते पेरमिली सशस्त्र चौकी दरम्यान केडमारा येथील जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत 3 नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. यात पेरमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी याच्यासह इतर पेरमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

पेरमिली आणि अहेरी दलम हे केडमारा येथील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असता नक्षल विरोधी सी-60 जवान शोधमोहीम राबवित असतांना नक्षल्यांनी गोळीबार केला, जवानांनीही प्रतिउत्तरदाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षली जंगलात पसार झाले दरम्यान परिसरात शोधमोहीम राबविली असता तीन नक्षलींचे मृतदेह आढळून आले. चकमकीनंतर परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली आहे.