आबासाहेब काकडे डी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न… अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर…

515

 

लोकवृत्त न्यूज‌
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख :-शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले बोधेगाव येथील आबासाहेब काकडे डी फार्मसी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2022 व 2023 च्या द्वितीय वर्ष बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी द्वितीय वर्ष विद्यार्थी व विद्यार्थिनी भावूक झाले होते विद्यार्थ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.तसेच प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आपल्यासाठी काय काय केले हे ही सांगितले व महाविद्यालयातील प्राचार्यांसमवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले व दोन वर्षात केलेल्या चूकांची कबुली देत माफी ही मागितली .तसेच या निरोप समारंभात अभिषेक म्हस्के,पंकज अन्नदाते,अजय करडे,विलास सौंदाने सचिन तौर, रणजित जाधव, शबनम शेख, वैष्णवी बेदरे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाविषयी कृतण्यता व्यक्त केली.व महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य राजेश मोकाटे सर, पत्रकार आफताब शेख,प्राध्यापक आसिफ शेख सर, सोमनाथ वडघने सर, देवीदास खराद सर, जयश्री कोकाट मॅडम,कांचन वनवे मॅडम,यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी शेटे,हर्षदा गाडे, यांनी तर आभार तनुजा पवार हिने मानले, तसेच कार्तिक बोराडे व‌ शिवम औटे यांच्यासह महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या नियोजन केले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.