नागपूर विभागातून देसाईगज नगर परिषद क्रमवारीत प्रथम

0
131

लोकवृत्त न्यूज ( Lokvrutt news)
देसाईगंज, ता. ७ जून : महाराष्ट्र राज्याच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत भरीव कामगिरी करणाऱ्या नगरपालिकांचे पुरस्कार जाहीर झाले असून नागपूर विभागात देसाईगंज नगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यात देसाईगंज नगर परिषदेने २५ वे स्थान प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्रालयाच्या नगरपालिका विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या गुणवत्ता स्पर्धेत देसाईगंज नगर परिषदेने नागपूर विभागातून प्रथम, तर महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेच्या यादीत २५ वे स्थान प्राप्त केले आहे नगर परिषद क्षेत्रात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाकडुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगर परिषदांना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. या निधीचा उपयोग देसाईगंज नगर परीषद क्षेत्रातील विकासकामांसाठी करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी दिली. या पुर्वीही डॉ. रामटेके यांच्या नेतृत्वात देश पातळीवरील स्वच्छता अभियानात देसाईगंज नगर परिषदेला ५ कोटी रुपयाचा पुरस्कार जाहीर झाला होता बदलीनंतर पुन्हा रुजु होऊन त्यांच्या नेतृत्वात पुन्हा क्रमवारी प्राप्त करून नगर परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा चढविला असून याचे सर्व श्रेय नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना जात असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here